सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

कमी लोकांच्या हातात असतो जादुई क्रॉस, आपले हात बघा आणि जाणून घ्या भाग्य

हाताच्या रेषा आपल्याबद्दल खूप काही सांगतात. तसेच आपल्याला हातात क्रॉस म्हणजे X असे चिन्ह असल्यास भाग्याने आपल्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. जाणून घ्या याचे रहस्य:
 
हातावर एखादी रेषा दुसर्‍याला कापत असेल तर क्रॉस चिन्ह बनतं. हस्तरेषा तज्ज्ञांप्रमाणे हे चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. हातावर असे चिन्ह असणारी व्यक्ती विद्वान, प्रसिद्ध राजकारणी किंवा मोठी कामगिरी करणारी असते. अशा लोकांचं सिक्स्थ सेंस देखील गजब असतं आणि हे लोकं दुसर्‍यांसाठी आदर्श असतात. या लोकांमध्ये आढळणारी ऊर्जा यांना विशेष स्थान मिळवून देते.
 
हातावर क्रॉस असणारे व्यक्ती लोकांना प्रेरित करतात आणि मेल्यानंतर देखील हे अमर होऊन जातात. असे लोकं यशस्वी असतात. यांची सहावी इंद्री किंवा अंतर्ज्ञान तेजस्वी असते. यांना येणारे संकट आधीच दिसून जातात. या दरम्यान यांच्या चारीबाजूला विशेष ऊर्जा निर्माण होते, हे समजणे सामान्य व्यक्तीच्या पलीकडे जातं.
 
अशा लोकांसमोर खोटं बोलल्याने आपण त्यांच्या नजरेतून खाली पडू शकता. अश्या लोकांनी क्षमा केले तरी आपला व्यवहार ते कधीच विसरू शकतं नाही. असे लोकं अत्यंत भाग्यवान असतात. कुणीही अशा लोकांचं काहीही बिघडवू शकतं नाही.