बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (08:12 IST)

भाईजानला पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज

salman khan
सलमान खान  57 वर्षांचा झाला. यानिमित्त सलमानच्या बांद्रा येथील घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकार पोहोचले होते. पार्टीत सलमान शाहरुखची गळाभेट आणि एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलाणीच्या कपाळावर केलेल्या किसची जोरदार चर्चा झालीच. याशिवाय, सल्लूभाईच्या घराबाहेर चाहत्यांवर पोलिसांनी केलेला लाठीमारही चर्चेचा चर्चेचा विषय ठरला.
 
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त गॅलेक्सीमध्ये मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हजेरी लावली. सलमानचे घर मुख्य रस्त्यावर असल्यामुळे चाहत्यांनी रस्त्यावरच मोठी गर्दी केली. ही गर्दीला आटोक्यात आणणे पोलिसांनाही कठीण गेले. 
 
सलमान खानने चाहत्यांना अभिवादन केले. यावेळी लाडक्या भाईजानला पाहून चाहत्यांचा उत्साह वाढला. सलमान खानला बघण्यासाठी इतके इतके चाहते आले होते की त्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. यावेळी पोलिसांनी दिसेल त्याला लाठीचा प्रसाद दिला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात पोलिस चाहत्यांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor