1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (14:14 IST)

"राधे: योर मोस्ट वांटेड भाई"चे नवे गाणे 'सिटी मार' प्रदर्शित; चार्टबस्टर ऑफ द ईयर बनण्यास सज्ज!

Seeti Maar song Radhe
‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत असून सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज, मेगास्टार सलमान खानने हा बहुप्रतीक्षित डांस नंबर प्रदर्शित केला असून प्रत्येक चित्रपटात सलमानच्या आइकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ पहिल्यापासूनच या वर्षीचा सर्वात मोठा चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.
 
या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.
 
सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये  प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उमद्या डांस मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.
 
सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.