बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (11:21 IST)

शाहरुखची लाडकी सुहानाला भेटायला पोहोचली गौरी खान, सोशल मीडियावर वायरल झाले फोटो

शाहरुख खानची लाडकी सुहाना खान आजकाल न्यूयॉर्कमध्ये आहे. नुकतेच तिने अॅक्टिंगचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले आहे. या दरम्यान आई गौरी खान, मुलीला भेटायला न्यूयॉर्क पोहोचली आहे. न्यूयॉर्कहून सुहाना खानचे दोन सुंदर फोटो समोर आले आहे जे आता  सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सुहाना खानने सोशल मीडियावर आईसोबतचा एक फोटो अपलोड केला आहे ज्यात तिने पिवळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम ब्लॅक शॉर्ट्स घातले असून कॅप लावली आहे. या फोटोनंतर सुहाना खानने एक अजून फोटो अपलोड केले आहे ज्यात ती एका रेस्त्रांमध्ये बसलेली आहे. आपल्या या लुकमध्ये किंग खानची मुलगी फारच सुंदर दिसत आहे. फोटोत गौरी खान देखील आहे.

सुहाना खान लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर फार वायरल झाले होते. सुहानाच्या या शॉर्ट फिल्मचे नाव ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लु’ आहे. असे म्हटले जात आहे की यानंतर सुहाना आपला बॉलीवूड डेब्यू करेल. पण याबद्दल अद्याप शाहरुख आणि गौरीकडून कुठलेही आधिकारिक बयान समोर आलेले नाही आहे.