मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (10:56 IST)

'स्त्री' चित्रपटाचे आणखीन दोन भाग येणार

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना यांच्या “स्त्री’ चित्रपटानं बॉक्‍स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर 180 कोटींचा गल्ला जमावताना सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता.
 
एका सत्य घटनेपासून प्रेरित असलेल्या या भयपटाला विनोदाची किनार होती. भयपट आणि विनोदीपट यांची उत्तम सांगड घालून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. मात्र, “स्त्री’ चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना संभ्रमात पाडणारा होता. कथेतील नेमकी “स्त्री’ म्हणजेच भूत कोण? हा प्रश्न अनुत्तरितच होता.
 
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार असे म्हणले जाऊ लागले होते. ज्यात वरुण धवनची वर्णी लागली असल्याचेही बोलले जात होते. त्यावर चित्रपटाचे निर्माते राज निधीमोरू आणि कृष्णा यांनी “स्त्री’ चित्रपटाचे आणखी दोन भाग येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भाग लवकरच येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर बॉलीवूड मधिल पहिला झोम्बी चित्रपट “गो गोवा गॉन’चाही सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.