suvichar
✕

शूटिंगदरम्यान शाहरुख खानला झाला अपघात, नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, शस्त्रक्रिया करावी लागली

Updated: मंगळवार, 4 जुलै 2023 (14:03 IST)
 
शाहरुख खान नुकताच लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान शाहरुखसोबत अपघात झाला. त्यामुळे त्याला दुखापत झाली. ही दुखापत फार मोठी नसली तरी. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. किंग खानला त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान नाकाला दुखापत झाल्याचे समजते. त्यानंतर अभिनेत्याच्या नाकातून रक्त वाहू लागले.
 
तेथे उपस्थित असलेल्या टीमने शाहरुख खानला तातडीने रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी अभिनेत्याच्या टीमला सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र नाकातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी शाहरुखवर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेनंतर शाहरुख खान बाहेर आला तेव्हा त्याच्या नाकावर मलमपट्टी करण्यात आली होती. आता शाहरुख खान भारतात परतला आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाच्या अपडेटसाठी खूप उत्सुक आहेत.
 
या महिन्यात 'जवान'ची झलक पाहता येणार असल्याचे मानले जात आहे. निर्माते चित्रपटाचा टीझर रिलीज करू शकतात. त्याचबरोबर जवान व्यतिरिक्त शाहरुखचे अनेक बिग बजेट प्रोजेक्ट आहेत. ज्यामध्ये डंकीचाही समावेश आहे. शाहरुखसोबत विकी कौशल आणि तापसी पन्नू देखील डंकीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी, रवीना, फराह आणि सोनालीसोबत रंगणार दिवाळीचा जल्लोष!

Ramayana Movie Review रणबीर कपूरमध्ये दिसले मर्यादा पुरुषोत्तम राम! तर यशच्या रावणाच्या रौद्र रूपाने वेधले लक्ष

Marathi Theater Day 2026: मराठी रंगभूमी दिन

राघव जुयालने 'रामायण'मध्ये साकारली मेघनादाची भूमिका; रावणाचा मुलगा म्हणून त्याचा उग्र अवतार समोर आला

दिवाळीत गर्दी टाळून फिरायचे आहे? कमी प्रसिद्ध पण सुंदर पर्यटनस्थळांचा शोध

पुढील लेख
Show comments