गंगा पंडालमध्ये गायक शंकर महादेवन यांनी "चलो कुंभ चले" गाण्याने सर्वांना केले मंत्रमुग्ध
Mahakumbh News: महाकुंभ हा भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्तींचा एक अद्भुत संगम आहे. गंगा पंडाल येथे संस्कृती विभागाच्या “संस्कृतीचा संगम” या विशेष कार्यक्रमात, प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी त्यांच्या गाण्यांनी गंगा पंडाल भक्तिमय बनवला. तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन म्हणाले की, महाकुंभसारख्या पवित्र कार्यक्रमाचा भाग असणे हे त्यांचे भाग्य आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. उद्घाटन समारंभात त्यांनी “चलो कुंभ चले” हे गीत सादर करून भाविकांना भक्तीने भरले. यानंतर, त्यांनी गणेश वंदना गायन करून संपूर्ण मंडप दुमदुमून गेला.
Edited By- Dhanashri Naik