1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (13:33 IST)

29 वर्षांपासून सलमान खानचे बॉडीगार्ड आहे शेरा, एवढी आहे सॅलरी

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा यांना कोण ओळखत नाही, शेरा देखील तेवढेच प्रसिद्ध आहे. जेवढे सलमान खान आहे. शेरा यांचे खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे. शेरा यांचा जन्म मुंबई मधील एक शीख कुटुंबात झाला होता आणि लहान पणापासून त्यांना बॉडी बिल्डिंगची आवड होती. 
 
शेरा यांना सलमान खानची सुरक्षा करीत अनेक वर्ष झाले. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या रक्षणासाठी सलमान खान शेरा यांना किती सॅलरी देतात. 
 
रिपोर्टनुसार सलमान खान आपली सुरक्षततेसाठी शेरा ला वर्षाला 2 कोटी पेक्षा जास्त रक्कम देतात. म्हणजे शेरा यांची सॅलरी महिन्याला 16 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. 
 
एका मुलाखतीमध्ये शेरा म्हणाले की, मी भाईजान सोबत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भाईजान सोबत राहील . 
 
तसेच शेरा यांची स्वतःची एक सिक्योरिटी एजन्सी आहे जी बिझनेसमन आणि सेलिब्रेटी यांना सुरक्षारक्षक प्रदान करते. या सिक्योरिटी एजन्सीचे नाव शेराने आपला मुलगा टायगर याचा नावाने ठेवले आहे.