शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (14:43 IST)

शिल्पा शेट्टीने 50 दिवसांत कमावले 1 कोटी

आपल्या अभिनाने आणि नृत्य कौशल्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा ही केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सोशल मीडिावरदेखील तितकीच लोकप्रिय आहे. ती सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पाचे टिक-टॉकवर 50 दिवसांमध्ये 1कोटी फॉलोअर्स झाले आहेत. फॉलोअर्सच्या संख्येत कशी वाढ झाली याची माहिती खुद्द शिल्पाने सोशल मीडिाद्वारे दिली आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम  अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'कोणी 50 दिवसांमध्ये 1 कोटी कमवू शकतं का? होय मी कमावले आहेत. आणि हे मी एकटीने केलेले काम नाही. तुम्ही आणि मी मिळून हे एक कोटी झाले आहेत. आपले 1 कोटीचे टिक-टॉक कुटुंब झाले आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हे' असे शिल्पा व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
 
अशा प्रकारे शिल्पाने टिक-टॉकवर एक कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. 50 दिवसांपूर्वी शिल्पाने टिक-टॉक व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. तिचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. आता तिने 1 कोटी फॉलोअर्सची संख्यादेखील पार केली आहे. शिल्पा लवकरच 'निकम्मा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यानंतर ती परेश रावलच्या 'हंगामा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे.