रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2018 (08:50 IST)

'म्हणून' त्याने तमन्ना भाटियावर बूट भिरकावला

'बाहुबली' चित्रपटात अवंतिकाची भूमिका साकारणाऱ्या तमन्ना भाटियाचे चित्रपट आवडत नसल्यामुळे एकाने तिच्यावर बूट भिरकावून फेकल्याची घटना  हैदराबादमध्ये घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून  त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हैदराबाद येथील हिमायत नगरमध्ये नव्याने सुरु झालेल्या एका ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी तमन्ना भाटिया पाहुणी म्हणून आली होती. तमन्ना गर्दीतून व्यासपीठाच्या दिशेने जात असताना करीमुल्लाह नावाच्या इसमाने तिच्या दिशेने बूट भिरकावला. हे बूट ज्वलरी शॉपमधील कामगाराला लागले.ती काम करत असलेले चित्रपट आवडत नसल्यामुळे ही कृती केली अशी कबुली संबंधीत इसमाने पोलिसांसमोर दिली आहे.