शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (16:06 IST)

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल (35) यांचे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आदित्य पौडवालच्या पश्चात आई अनुराधा पौडवाल आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे. 
 
दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य त्यांच्या आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत होता. म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम केले होते.