1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (17:53 IST)

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव

Disqualification motion
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी शिवसेनेकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. 
 
“हा हक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रणौतनं केलेली गद्दारी आहे याचा उल्लेख करावासा वाटेल. २०१६ मध्ये कंगना रणौतच्या बाबतीत अध्ययन सुमन याला कोकेन घेण्यास सांगत होती असं त्यानंच सांगितलं होतं. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत,” असं भाई जगताप यावेळी म्हणाले.
 
यापूर्वी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.