सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (07:45 IST)

राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर जाणार

महाराष्ट्र विधान परिषदेतल्या राज्यपाल नियुक्त रिक्त होणाऱ्या १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या ४ जागांचा निवाडा  झाला आहे. यात  राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक जागा राजू शेट्टींना देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे.
 
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज बारामतीला शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सुरुवातीला ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं गेलं. शरद पवारांनी देखील त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून तसं ट्वीट करून भेटीचे फोटो पोस्ट केले. नंतर मात्र राजू शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्यावर याच बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त आलं. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी कोल्हापूर राजू शेट्टींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील सुरुवातीला जयंत पाटील राजू शेट्टींच्या मातोश्रींच्या प्रकृतीची विचापूस करण्यासाठी आले असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर खुद्द राजू शेट्टींनीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा प्रस्ताव आला असून त्यावर चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं.