सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (17:02 IST)

सोनू निगमचा ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय

singer sonu nigam quits twitter
सोनू निगमने त्याचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करून सोनू निगमने ही माहिती दिली आहे. अभिजीतच्या समर्थनासाठी सोनूने एकामागे एक असे एकूण चोवीस ट्विट्स केले आहेत. या ट्विटसमध्ये त्याने विविध मुद्दे मांडले आहेत. खरंतर अभिजीत भट्टाचार्य यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या शेहला रशिद आणि लेखिका अरूंधती रॉय यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या कारणामुळे गायक अभिजीत यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.