1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (18:13 IST)

सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट

शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाला उशिराने हजर राहिले. पूर्वी ते मुलीच्या लग्नाला तयार नहव्ते.आता ते लग्नाला तयार झाले आहे. आता त्यांनी सोनाक्षीच्या लग्नावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, सोनाक्षी आणि झहीरचे लग्न 23 जून ला होणार नाही.  

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोठे अपडेट दिले आहे. ते म्हणाले, मी आणि माझी पत्नी 23 जून 2024 रोजी या उत्सवात सहभागी होणार. मात्र सोनाक्षीचे लग्न 23 जून ला नाही. हे वेडिंग रिसेप्शन आहे. या समारंभात आमचे कुटुंब एकत्र दिसणार आहे. लग्नापूर्वी भांडणे होणे हे सामान्य आहे. आता सर्व काही व्यवस्थित आहे. प्रत्येक घरात वाद होतात. आता सर्व काही ठीक आहे. काही तणाव होते हे आता दूर झाले आहे. 

शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाच्या विरोधात होते. सोनाक्षीने झहीर इक्बालशी लग्न करावे असे त्यांना वाटत नव्हते. त्याला आपल्या मुलीचे लग्न आंतरजातीय होऊ नये असे वाटत होते.पण सोनाक्षी कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिच्या 7 वर्षाच्या नात्याला नाव देत होती. अखेर वडिलांनी मुलीच्या प्रेमापोटी लग्नाला होकार दिला. 
 
Edited by - Priya Dixit