1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (16:35 IST)

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक

Anupam Kher
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या कार्यालयात चोरी झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. अनुपम यांनी त्यांच्या कार्यालयातून लेखा विभागाचे कागदपत्रे आणि फिल्म निगेटिव्ह चोरीला गेल्याचे सांगितले होते.
 
यांच्या कार्यालयात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही चोरटे असल्याचे ओशिवरा पोलिसांनी सांगितले. ते शहरातील विविध भागात फिरून वाहनचोरी करतात. 
 
अनुपम खेर यांच्या कार्यालयात ज्या दिवशी चोरी केली त्यादिवशी ते दोघेही ऑटोमध्ये मुंबईतील विविध भागात फिरत असत आणि चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. त्याच दिवशी मुंबईतील विलेपार्ले भागात देखील चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. दोन अज्ञातांनी कार्यालयात शिरून चोरी केली. कार्यालयाच्या तिजोरीत चार लाखांहून अधिक रुपयांची रोकड असल्याचे खेर यांनी पोलिसांना सांगितले होते. तेथे एक पिशवीही ठेवण्यात आली होती. या बॅगमध्ये त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 2025 मध्ये आलेल्या 'मैंने गांधी को नही मारा' या चित्रपटाचे निगेटिव्ह रिल्स होते. ते घेऊन चोरटे पळाले होते. 
 
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चोरीच्या घटनेची माहिती देताना याप्रकरणी त्यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला होता.चोरीप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit