शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (14:20 IST)

सोनू सूद संतापून म्हणाला “एकदा भेटा मग दाखवतो”

करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यापासून गरीब विद्यार्थांच्या शिक्षणापर्यंत विविध प्रकारची मदत तो करत आहे. 
विशेष म्हणजे ही सर्व मदत तो मोफत करत आहे. मात्र काही मंडळी सोनू सूदचं नाव वापरुन लोकांना फसवत आहेत. खोटे मेसेज आणि वॉट्सअॅप (whatsapp)नंबरद्वारे पैसे उकळत आहेत. अशा मंडळींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सोनूने दिला आहे.

“कृपया कोणालाही पैसे देऊ नका. आमच्या सर्व सेवा फ्री आहेत. जी मंडळी गरीबांना फसवून पैसे मिळवतायत त्यांनी एकदा येऊन मला भेटावं. मी तुम्हाला मेहनत करायला शिकवेन. प्रामाणिकपणे आयुष्य जगायला शिकवेन.” अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. या ट्विटद्वारे त्याने फसवणूक करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.