1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. South Film Toxic A Fairy Tale for Grown Ups Trailer Released

साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'चा धमाकेदार ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याच्या कथानकाविषयीची उत्सुकता वाढत होती. आतापर्यंत प्रदर्शित झालेले टीझर्स, पोस्टर्स आणि गाण्यांमधील जवळीक व हिंसाचाराच्या दृश्यांमुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले होते.

मात्र, चार मिनिटांपेक्षा जास्त लांबीच्या या अधिकृत ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची थेट आणि ठोस उत्तरे दिली आहे. तसेच  या चित्रपटात कियारा अडवाणी आणि तारा सुतारिया यांचे रोमँटिक आणि रहस्यमय अवतार दाखवले आहे, तर नयनतारा आणि हुमा कुरेशी यांची दमदार आणि तीव्र पात्रेही आहे. रुक्मिणी वसंत यांची महत्त्वपूर्ण भूमिका कथेला एक नवीन वळण देते.

चित्रपटापेक्षाही हा ट्रेलर मोठ्या पडद्यावरील ॲक्शनचा एक नवीन इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांनी केले आहे. त्यांनी हा डार्क ॲक्शन-ड्रामा एका सूक्ष्म आणि आंतरराष्ट्रीय शैलीत साकारला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड ॲक्शन दिग्दर्शक जे. जे. पेरी आणि भारतीय स्टंट तज्ञ अंबरीव यांचे दमदार ॲक्शन दिग्दर्शन आहे. या चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि यशच्या स्वतःच्या 'मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स' या बॅनरखाली झाली आहे.
हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये कन्नड, हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांनी, म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी, श्रद्धा कपूर अभिनीत मॅडॉक फिल्म्सचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'ईथा' देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या