गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (13:57 IST)

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांना ट्विट करून सांगितले

South superstar Chiranjeevi Corona Positive
साऊथचा सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. चिरंजीवीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. चिरंजीवीने लिहिले, 'प्रिय सर्व, सर्व सावधगिरी बाळगूनही मी काल रात्री सौम्य लक्षणांसह कोविड पॉझिटिव्ह आढळलो . मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्यासाठी उत्सुक आहे.'

चिरंजीवीने ट्विट करताच चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले . एका यूजरने लिहिले - बॉस लवकर बरे व्हा. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले - स्वतःची काळजी घ्या. या कोविडने उच्छाद मांडला आहे. शेकडो चाहत्यांनी चिरंजीवीची चिंता करत लिहिले – सर लवकर बरे व्हा. तुम्हाला लवकरच बरे वाटेल अशी आशा आहे.