साऊथचा सुपरस्टार रुग्णालयात
अभिनेते अजित कुमार प्रकृती अस्वस्थ असल्याचे समजल्यानंतर त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक गोष्टी अजित कुमार यांच्या प्रकृतीबाबत बोलल्या जात आहेत. तसेच त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली असा दावा केला जात आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. साऊथचा सुपरस्टार अजित कुमार यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला जात आहे.
पण अजित कुमार यांच्या मॅनेजरने यांनी त्यांच्या आरोग्याबद्द्ल महत्वाची माहित दिली आहे. मॅनेजर म्हणाले की अजित कुमार यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यांना नियमित आरोग्य तपासणी करीता रुग्णालयात आणले गेले आहे. त्यांचे मॅनेजर म्हणाले की ब्रेन ट्यूमर ऑपरेशनची बातमी खरी नाही. तसेच रूटीन चेकअपसाठी अजित कुमार यांना दाखल केले होते. तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्याच्या कानाखालील नसा थोड्या कमकुवत असल्याचे आढळले व अर्ध्या तासांत त्यांच्यावरील उपचार पूर्ण झालेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार यांना आता जनरल जनरल वॉर्डमध्ये आणले. तसेच त्यांना रुग्णालयातून त्यांना 9 मार्च 2024 रोजी डिस्चार्ज मिळू शकतो, असे ही त्यांचे मॅनेजर म्हणालेत.