बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (16:18 IST)

श्रीदेवीने मुलगी जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट 'धडक' पाहिला होता, बोनी कपूरचा खुलासा

Sridevi watched film Dhadak बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत निधन झाले. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. त्याचवेळी, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी तिची मोठी मुलगी जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
 
श्रीदेवी आपल्या मुलीचा अभिनय पडद्यावर पाहू शकली नाही याचे दु:ख अनेकांना होते. पण आता एका मुलाखतीदरम्यान श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे की, दिवंगत अभिनेत्रीने जान्हवीचा पहिला चित्रपट पाहिला होता.
 
ETimes शी बोलताना बोनी कपूर म्हणाले, जेव्हा जान्हवी मोठी झाली तेव्हा चित्रपट निर्माता करण जोहर एकदा तिच्या घरी आला आणि त्याने जान्हवीला चित्रपटात लॉन्च करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीदेवी हयात असताना करणला जान्हवीला 'कलंक' या चित्रपटात लॉन्च करायचे होते, ज्याचे नाव आधी 'शिद्दत' होते.
 
बोनी म्हणाले की, करणची इच्छा होती की जान्हवीने 'कलंक'मध्ये आलिया भट्टने साकारलेली भूमिका साकारावी. एवढेच नाही तर माधुरी दीक्षितने साकारलेली भूमिका श्रीदेवीने करावी. तिने अनिच्छेनेच हा चित्रपट करण्यास होकार दिला. त्यानंतर करणने जान्हवीसोबत 'धडक' बनवण्याचा निर्णय घेतला होता.
 
बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे की, श्रीदेवी हयात असताना आम्ही 'धडक'च्या रॅश (लघु क्लिप) पाहिल्या. अशा स्थितीत त्यांना त्यांची मुलगी पडद्यावर दिसली.