मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (09:26 IST)

Daughter killed in front of mother आईसमोरच मुलीची हत्या

murder
Kalyan Crime News Marathi : मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत मुलगी दुर्गा  दर्शन सोसायटीत राहत असून ती आईसह घरी जात असताना सोसायटीच्या आवारातच हा प्रकार घडला. आई समोरच आरोपीने या 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला करत तरुणीच्या डोक्यावर, छातीवर आणि मानेवर चाकुने वार केले. तरुणीने आरडाओरड करताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून तरुणीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
 
 ही घटना कल्याण येथील आहे. तरुणी कोचिंग क्लासहून घरी येत असताना  तिच्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण शहरातील तिसगाव भागात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.