मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मासिकाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे सुहाना

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. पदार्पणापूर्वीच तिचा स्वत:चा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही अधिराज्य गाजवणाऱ्या सुहानाला कलाविश्वात तिचा पहिला प्रोजेक्ट मिळाला आहे. ती लवकरच एका मासिकाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती तिची आई गौरी खानने दिली.
 
‘सुहाना एका मासिकासाठी शूट करणार आहे. त्या मासिकाचं नाव मी आता सांगू शकणार नाही पण तिच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी मी फार उत्सुक आहे,’असं गौरी म्हणाली.सुहानाला बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याची इच्छा आहे असे शाहरुखने याआधी सांगितले होते. ती सध्या तिच्या कॉलेजमधील रंगभूमीवर चांगले काम करत असल्याचे शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले होते. फक्त शाहरुखच नाही तर सुहानाच्या अभिनयाचे कौतुक शबाना आझमी यांनी देखील केले आहे.