रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

गाजलेली हिट मालिका जबान संभालके येतेय पुन्हा वेब सिरीजमध्ये

सर्वात हिट असेलेली आणि सध्या गतकाळातील गोल्डन सिरीयल जबान संभालके पुन्हा सर्वांच्या भेटीला येत  आहे. जवळपास दोन दशकांपूर्वी हिंदी शिकणाऱ्या वल्लींवर बेतलेली ही मालिका आहे. यामध्ये विविध भाषिक एका शिक्षकाकडे हिंदी शिकण्यासाठी येतात,मग का त्यातून उडणारी धमाल यात  मालिकेत सुंदर रित्या दाखवली आहे.  त्यावेळी ही मालिका सुपर हिट झाली होती. आता तीच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. 

यावेळी मात्र ती एका वेबसीरीजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार. पूर्वीच्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर हे  मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासह शुभा खोटे, विजू खोटे, अश्विनी बलसावर, तनाझ इराणी, टॉम अल्टर असे अनेक तगडे कलाकार त्या मालिकेत होते. माइंड युवर लँग्वेज या मूळ इंग्रजी शोचं ते हिंदी रुपांतर होतं. विविध प्रांतातले लोक हिंदी शिकण्यासाठी म्हणून एका संस्थेत जमा होतात आणि त्यांना हिंदी शिकवताना उडणारी धमाल या मालिकेत दाखवण्यात आली होती.

आता या वेबसीरीजमध्ये सुमीत राघवन, बख्तियार इराणी, रुपाली भोसले, राकेश श्रीवास्तव, शोमा आनंद, तनु खान असे कलाकार दिसणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वाना तो येरा अनुभव करता येणार आहे. मग पुन्हा एकदा जबान संभालके.