मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (12:35 IST)

बीग बजेट चित्रपटातून सुनील शेट्टीचे कमबॅक

suniel shetty
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी 5 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर होता. आता तो पुन्हा कमबॅक करण्याच्या जोरदार तयारीत आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील लूक पाहता, ते दिसून येते. डायरेक्टर प्रियदर्शन यांच्या आगामी बीग बजेट असलेल्या 'मरक्कड-द लॉयन ऑफ अरेबियन सी' चित्रपटात सुनील 16व्या शतकातील एका योद्ध्याची भूमिका  साकारत आहे. हा चित्रपट नेव्ही चीफ मोहमम्द अली उर्फ कुंजली रक्कड 4 यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्येएकाच वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 150 कोटींचे असणार आहे. सुनील आणि प्रियदर्शन यांचा हा ड्रीम प्रॉजेक्ट असून दोघेजण 10 वर्षांनंतर पुन्हा एकत्रित काम करत आहेत. सुनीलचा लूक हा हॉलिवूडमधील 'ट्रॉय'सारखा आहे. दरम्यान, मोहनलाल, प्रभुदेवा आणि सुनील शेट्टी 85 ते 90 दिवस रामोजी फिल्म सिटीत शूटिंग करणार आहेत.