सुनील शेट्टी करतोय 'या' चित्रपटातून मराठीत पदार्पण
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या मराठीत पदार्पणाने मराठी रसिकांना त्याचा डाशिंग लुक रसिक प्रेषकांना पाहता येणार आहे. अ.ब.क या चित्रपटात सुनील शेट्टीने 'बाप्पा' हि व्यक्तिरेखा साखारली असून सुनील शेट्टीचे सध्या 'बाप्पा बाप्पा' हे गाणे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. सुनील शेट्टीचा या चित्रपटातील आगळावेगळा रोल रसिकांना नक्कीच आवडेल. या चित्रपट तो मराठीत बोलला असून त्याचे चित्रपटातील संवाद मराठी आहेत. सुनील शेट्टी म्हणाला, मी महाराष्ट्रीय आहे. आमचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात राहते. मराठी सण, मराठी अस्मिता त्याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ मला खूप आवडतात.
ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व वेंकीज प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचे लेखक आबा गायकवाड असून संगीतकार बापी - टूटूल व साजिद वाजीद हे आहेत. तर कॅमेरामन महेश अने हे आहेत. या चित्रपटात साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, सनी पवार, आर्या घारे, विजय पाटकर, सतीश पुळेकर, किशोर कदम आदि कलाकार या चित्रपटात आहेत. अमृता फडणवीस यांनी या चित्रपटात स्त्रियांना प्रेरणा देणारे पेटूनी 'उठू दे एक ज्वाला' हे गीत गायले आहे. येत्या ८ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे.
मुली वाचवा, मुली शिकवा’ या विषयावर थेट भाष्य करणाऱ्या अ.ब.क चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाज दिला असून चित्रपटाचा मुख्य नायक मोदीजींच्या बहुचर्चित रेडीओवरील ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून कशी प्रेरणा घेतो. या गोष्टी चित्रपटात दाखवण्यात आले असून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाला त्यांचा आवाज दिला आहे. त्याच बरोबर या चित्रपटातील ‘पेटून उठू दे एक ज्वाला’ हे स्त्री वर्गाला स्फुर्ती देणाऱ्या गीताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा स्वर लाभला आहे.