शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (12:33 IST)

सुपस्टार रजनीकांत यांच्या आलिशान घरात शिरले पावसाचे पाणी

rajinikanth
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चेन्नईतील घराला मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. पावसामुळे त्यांचे पोस गार्डन येथील आलिशान घर जलमय झाले आहे. तसेच चेन्नईत सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान घराला पाणी साचले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांच्या पोस गार्डनमधील घरात पावसाचे पाणी तुंबले असून याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या बाधित भागातील पाणी काढण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहे.
 
मंगळवारी चेन्नई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून शहरवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागले.

Edited By- Dhanashri Naik