बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (16:21 IST)

विमानात शेजारी बसलेल्या प्रवाशाने महिलेचा केला विनयभंग

दिल्ली-चेन्नई विमानामध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत एक घटना घडली. महिलेच्या शेजारी असलेल्या सीटवर एक प्रवासी बसल्याचे सांगण्यात येत आहे. व एवढेच नाही तर त्याने तिच्यासोबत छेडछाड केली. तिने आक्षेप घेतल्यानंतरही त्याने छेडछाड सुरूच ठेवली. विमान उतरल्यानंतर 43 वर्षीय या व्यक्तीलाअटक करण्यात आली आहे. 
 
फ्लाइटमध्ये विनयभंगाच्या घटना सध्या वाढतच आहे. पुन्हा एकदा विनयभंगाची घटना घडली आहे. चेन्नई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिल्ली-चेन्नई फ्लाइटमध्ये एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीनंतर या प्रवाशाला अटक करण्यात आली. या संदर्भात एअरलाइन्सकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.  
 
 ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली असून महिलेने आरोप केला आहे की, एक प्रवासी  फ्लाइटमध्ये महिलेच्या शेजारी बसला होता. यादरम्यान त्याने महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. विरोध करूनही हे कृत्य सुरूच राहिल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले आहे.

Edited By- Dhanashri Naik