1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेता करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा पर्यंत गुलाबी रंगाची फॅशन करणारे फॅशनिस्ट अभिनेते !

Superstars in Pink Blazer पिंक ब्लेझर ट्रेंड ची अनोखी झलक दाखवणारे हे खास अभिनेते !
 
गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवुड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोब ची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशन ची एक झलक पाहूया !
 
रणवीर सिंग हा त्याचा हटके फॅशन साठी ओळखला जातो. नेहमीच्या फॅशन ला थोडा अनोखा ट्विस्ट देत तो कायम चर्चेत राहतो. नेव्ही ब्लू टी-शर्टवर गुलाबी जॅकेट घालून त्यांनी त्याचा फॅशन गेम सेट केला आहे आणि तो त्यात तितकाच कमाल दिसतो.
 
करण कुंद्रा हा फॅशनच्या खेळात बेस्ट मानला जातो. त्याचा नवीन फॅशन- स्टाईल साठी तो आताच्या पिढी साठी फॅशन आयकॉन बनला आहे. ब्लश पिंक ब्लेझर सूट मध्ये तो अगदीच हँडसम दिसतोय.
टायगर श्रॉफ त्याच्या गुलाबी रंगाच्या सूटमध्ये  प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. रोजच्या फॅशन मधून थोडा ब्रेक घेत पांढरा शर्ट  सोबत त्याने ह पिंक सूट एकदम मस्त कॅरी केला आहे.
 
विजय देवरकोंडा हा त्यांचा फॅशन साठी नव्याने ओळखला जातो. लिगर फेम अभिनेता त्याच्या लैव्हेंडर शर्टसह  बबलगम गुलाबी सूट मध्ये एकदम कमाल दिसतोय.