मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (15:30 IST)

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आश्चर्यकारक दावा, त्याला स्टन गनने मारलं

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात एक नवीन आश्चर्यकारक दावा समोर आला आहे, ज्यात असं म्हटलं जात आहे की सुशांतला स्टन गनने ठार मारण्यात आलं. याबाबत सुशांतच्या फॉलोअर्सने ट्विट केलं आहे, ज्यात त्याने म्हटलं आहे की, स्टन गनचे निशाण सुशांतच्या गळ्यावर दिसत होते. भाजपचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या दाव्याचं समर्थन केलं आहे.
 
ज्या व्यक्तीने स्टन गनचा दावा केला आहे ती व्यक्ती राजू वाधवा नावाची असून अमेरिकेत डॉक्टर असल्याचं सांगत आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की सुशांतच्या बाबतीत स्टन गन वापरण्यात आली असून त्याच्या मानेवर डाव्या बाजूला जळालेलं डाग आहे. त्यांनी असंही लिहिलं आहे की, जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की त्याचा चेहरा अर्धा लुळा पडलेला दिसत आहे, ज्यास बेल्स पॅल्सी म्हणतात. जे उच्च व्होल्टेजमुळे होतं. 
 
ते म्हणाले की या कारणास्तव त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला पक्षाघात झाला होता व डावा डोळा उघडा होता. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे असं लिहिले आहे की ७ व्या क्रॅनल नर्व आणि शॉकमुळे सुशांतचा एक डोळा बंद होऊ शकला नाही. त्यांनी असंही लिहिलं आहे की अमेरिकेच्या नौदलाच्या सील अधिकाऱ्याला ठार मारण्यासाठी अशाच प्रकारची स्टन गन वापरली गेली होती आणि त्याने आत्महत्या केली असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फॉरेन्सिक तपासनीत मारेकरींना पकडण्यात आलं.
 
यानंतर एका वापरकर्त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “आज मी स्टन गनबद्दल वाचलं आणि मला ते कसं वापरायचं ते देखील माहित आहे. हे शरीरावर कोणत्या प्रकारच्या खुणा सोडते ते पहा आणि हे अगदी तशाच खुणा आहेत. पक्षाघात करण्यासाठी त्यांनी स्टन गनचा वापर केला.”