गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (13:17 IST)

Bhushan Kumar Rape Case: भूषण कुमारवर काम मिळण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप

टी सिरीजचे एम.डी. भूषण कुमार यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमारविरूद्ध हा बलात्काराचा गुन्हा मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी दाखल केला आहे. भूषण कुमारने टी-सीरीज प्रकल्पात काम करण्याचे आमिष दाखवून 30 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
 
भूषण कुमारने आपला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. उल्लेखनीय आहे की की भूषण कुमार यांच्यावर असे आरोप प्रथमच झाले नाहीत. यापूर्वी मीटू चळवळीच्या माध्यमातून मॉडेल मरीना कुंवर यांनीही भूषण कुमारवर शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता.