गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (11:55 IST)

WI vs AUS:क्रिस गेल ने टी-20 क्रिकेट मध्ये इतिहास रचला,हा करिष्मा करणारे ते जगातील पहिले फलंदाज ठरले

WI vs AUS: Chris Gayle makes history in T20 cricket
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेलने स्फोटक फलंदाजी केली. या दरम्यान त्याने टी -20 क्रिकेटमध्ये एक अद्वितीय कामगिरी केली.क्रिकेटच्या या स्वरुपात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉसच्या नावावर आधीच नोंदलेला आहे. 
 
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडीज दौर्‍यावर पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळत आहे.मालिकेचा तिसरा सामना 12 जुलै रोजी सेंट लुसियामध्ये खेळला गेला. हा सामना कॅरेबियन संघाचा तुफानी फलंदाज क्रिस  गेलसाठी खास होता. या सामन्यात युनिव्हर्स बॉसने स्फोटक फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलनंदांचा सामोरं मोठे आव्हान उभारले. 
 
आपल्या खेळी दरम्यान गेलने टी -20 क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम नोंदविला. टी -20 क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.आतापर्यंत टी -20 क्रिकेटमध्ये कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत जाणून घेऊ या.
 
टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे.या प्रकारात त्याने आतापर्यंत 14038 धावा केल्या आहेत. गेलने 2005 साली टी -20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली.टी -20 क्रिकेटमध्ये त्याने 431 सामने खेळले असून त्यात त्याने 22 शतके आणि 86 अर्धशतके झळकावली आहेत.गेल जगभरातील डझनभर टी -20 लीगमध्ये भाग घेत आहे.टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा,सर्वाधिक शतके,सर्वाधिक अर्धशतक,सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. 
 

कीरॉन पोलार्ड
 
वेस्ट इंडीजचा मर्यादित षटकांचा कर्णधार कीरॉन पोलार्ड टी -20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. या प्रकारात त्याने आतापर्यंत 10836 धावा केल्या आहेत.टी -20 कारकीर्दीत पोलार्डने शतकांसह 54 अर्धशतके केली आहेत. 
 
शोएब मलिक
 
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक टी -20 क्रिकेटमधील तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाज आहे.या प्रकारात त्याने आतापर्यंत 10741 धावा केल्या आहेत. टी -20 क्रिकेटमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 95 अशी आहे. याशिवाय त्याने 66 अर्धशतके झळकावली आहेत. 
 
 
डेव्हिड वॉर्नर
 
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी -20 फॉर्मेटमध्ये बऱ्याच धावा केल्या आहेत.टी -20 स्वरूपात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.या फॉर्मेटमध्ये वॉर्नरच्या नावावर 10017 धावा आहेत ज्यामध्ये त्याने 8 शतके आणि 82 अर्धशतकांची नोंद केली आहे. 
 
विराट कोहली
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देशासाठी टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसे, जागतिक मंचावर पाहिले तर विराट जगातील चौथ्या क्रमांकाचा टी -20 फलंदाज आहे. टी -20 क्रिकेटमध्ये त्याचे नाव 9922 धावा आहे. विराटने आतापर्यंत या प्रकारात 5 शतके,72 अर्धशतके झळकावली आहेत.