1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (11:34 IST)

अविस्मरणीय ODIसामन्याचे 19 वर्षे

फोटो -सोशल मीडिया 
आजच्या दिवशी म्हणजे 13 जुलै 2002 रोजी इंग्लंडचा ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान.सामना भारत विरुद्ध इंग्लड अंतिम सामना.संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी गच्च भरलेललं होत.रणक्षेत्रात मोहम्मद कैफ आणि जहीरखान खेळत होते.त्यांनी आपली विजयी धाव पूर्ण करतातच इंग्लंड चा खेळाडू फ्लिंटॉफ हा तर चक्क डोक्याला हात लावतच खाली बसला.विजयी धाव पूर्ण केली बघता. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले भारतीय संघाचे कर्णधार सौरव गांगुलीने जल्लोषात येऊन चक्क आपली शर्ट काढून हवेत फिरवली.हाच तो सामना होता ज्यामध्ये भारताने दाखवून दिले की भारत परदेशात खेळून देखील जिंकू शकतो.  हा सामना अविस्मरणीय ठरला.आज या सामन्याला 19 वर्षे पूर्ण झाली.