शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (13:59 IST)

India vs Sri Lanka: मालिका पुन्हा रिशेड्युल झाल्या,जाणून घ्या श्रीलंकेत खेळाडू काय करत आहे

शिखर धवन यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौर्‍यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिका 13 जुलैपासून सुरू होणार होती, आता त्याचे वेळापत्रक रिशेड्युल करण्यात आले असून ते 18 जुलैपासून सुरू होईल.टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि त्यानंतर टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या तयारीसाठी दोन इंट्रा-स्क्वाड सामने खेळले आहेत. मालिका पुन्हा रिशेड्युल झाल्यानंतर टीम इंडियाला तयारी करण्याची अधिक संधी मिळाली आहे आणि खेळाडूही त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. 
 
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चा सराव करताना दिसत आहेत. भारताचा द्वितीय श्रेणीचा संघ या दौर्‍यावर गेला आहे. खरं तर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे आणि या कारणास्तव अनेक ज्येष्ठ खेळाडू या मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग नाहीत.
 
नॅशनल क्रिकेट अकॅडमी (एनसीए) प्रमुख आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासह श्रीलंका आले आहेत. या मालिकेसाठी देवदत्त पडिकक्कल, चेतन सकारिया,वरुण चक्रवर्ती आणि ऋतुराज गायकवाड या तरूण क्रिकेटपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
 
 शिखर धवन संघाचा कर्णधार तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार आहे. अनुभवाबद्दल बोलायचे झाले तर धवन,भुवी व्यतिरिक्त हार्दिक पांड्या, मनीष पांडे, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या संघासह आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका आता 18 जुलै ते 29 जुलै दरम्यान खेळली जाईल.
 
भारत श्रीलंका दौर्‍यासाठी नवीन वेळापत्रक
 
18 जुलै, पहिला वन डे आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो 
 
20 जुलै, दुसरा वन डे आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो
 
23 जुलै, तिसरा वन डे आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो
 
25 जुलै, पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो
 
27 जुलै, दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम,कोलंबो
 
29 जुलै, तिसरा वन डे आंतरराष्ट्रीय,आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार