तापसी पन्नूने केला लग्नाचा मोठा खुलासा
अनेक दिवसांपासून बॉलिवूड मधील अभिनेत्री तापसी पन्नू ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या चर्चेत आहे. बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएला ती बऱ्याच काळपासून डेट करीत होती. तसेच तापसीचे लग्न झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तसेच कोणतीही प्रतिक्रिया तापसीने या बातम्यांवर दिलेली नाही. आता या बातम्यांनावर तापसीने अखेरीस मौन सोडले आहे. एका मुलाखती दरम्यान मॅथियासबरोबर लग्न केल्याचं तिने सांगितले आहे. तापसी म्हणाली की, मी माझे वैयक्तिक आयुष्य जजमेंटसाठी खुलं करावं, असे मला वाटत नाही. जर मी सर्व गोष्टी सांगितल्या तर माहित नाही मला कसे जाणवेल, मी हे सर्व माझ्यापर्यंत ठेवले आहे.
तसेच तापसी म्हणाली की, माझा कोणताही हेतू नाही, लग्न खासगी करण्याचा. मला माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहायचे होते, तसेच त्यांना माहित होते की, मला कसे लग्न करायचे आहे. ते माझ्या सेलिब्रेशनचा भाग होते. तसेच लोक कसे व्यक्त होतील याबद्दल मला काळजी वाटते, म्हणून मी माझ्या लग्नाची बातमी सार्वजनिक केली नाही. मिळालेल्या माहितीनुसार तापसीची मोठी बहीण शगुन हिने तापसीच्या लग्नाचे सर्व कार्य हाताळले असे समजले.
Edited By- Dhanashri Naik