सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (09:40 IST)

आयपीएलमध्ये जागा आहे का? तैमूर खेळण्यासाठी सज्ज

करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर तैमूरचा एक फोटो शेअर करत विचारले आहे की IPL मध्ये जागा आहे का? मी खेळण्यासाठी सज्ज आहे. या फोटोत तैमूरच्या हातात त्याच्या वयापेक्षा भली मोठी बॅट दिसत आहे आणि तो क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. 
 
सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिडची अनेकदा चर्चा रंगत असते त्यातून तैमूरतर सर्वांचा लाडका आहे. तो कायमचं चर्चेचा विषय ठरत असतो. 
 
दरम्यान, सध्या करीना लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून दिल्लीमध्ये या सिनेमाचं शुटींग सुरु असून तैमूरदेखील करीनासोबत या सेटवर आहे.