खांद्यावर कॅमेरा पडल्याने सुपरस्टार अभिनेता जखमी
आगामी कांगुवा या चित्रपटाचे शूटिंग करत असताना साउथ सुपरस्टार सूर्याच्या खांद्यावर कॅमेरा पडल्याने अभिनेता जखमी झाल्याची बातमी आहे. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कॅमेऱ्यावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात असून चित्रीकरण चेन्नईतील एका फिल्मसिटीमध्ये सुरू आहे, जिथे निर्मात्यांनी एक भव्य सेट बांधला आहे. रिपोर्ट्सनुसार कंगुवाच्या शूटिंगदरम्यान एका रोप कॅमेऱ्याचे नियंत्रण सुटले आणि तो सुर्यावर पडला. त्यामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. मात्र तो सध्या रुग्णालयात दाखल असून याशिवाय कोणत्याही प्रकारची बातमी मिळालेली नाही. दरम्यान चाहते अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे.
सूर्याने कंगुवामध्ये आपल्या लुकसाठी काही किलो वजन कमी केल्याचे देखील सांगितले जात आहे. अॅक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले शिवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. एक्शन ड्रामाने भरपूर ही हाय बजेट मूव्ही मेकर्सने जगभरात 38 भाषांमध्ये रिलीझ करण्याची योजना आखली आहे.