बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (19:12 IST)

भन्साळींच्या आगामी चित्रपटात दिसणार तापसी?

दिग्दर्शक संजय भन्साळींची गणती हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात उत्कृष्ट व खास दिग्दर्शकांमध्ये होते. त्यांचा मागील चित्रपट पद्मावतने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षाही जास्त कमाई केली होती. त्यामुळे अनेक कलाकारांना भन्साळींबरोबर काम करण्याची इच्छा आहे.
 
आता जेव्हा भन्साळी आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत, तर अनेक कलाकार भन्साळी यांनी आपल्याला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये कास्ट करावे म्हणून खटपट करत आहेत. आता या कलाकारांमध्ये तापसी पन्नूचे नावही जोडले गेले आहे.
 
तापसीला संजय भन्साळी यांच्या जुहूस्थित ऑफिसच्या बाहेर पाहण्यात आले. त्यावेळी तापसीने तब्बल एक तास भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये घालवल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भन्साळींच्या चित्रपटामध्ये दोन अभिनेत्रींना स्थान असते. त्यामुळे यावेळेसही भन्साळींनी जर दीपिका-रणवीर यांच्या जोडीबरोबर तापसीलाही या चित्रपटाचा हिस्सा बनवले, तर नवल वाटायला नको.