बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (00:05 IST)

भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान-शाहरुखची जोडी

पुन्हा एकदा रुपेरी पडावर बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान एकत्र पाहायला मिळणार आहेत. संजय लीलाभन्साळींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये हे दोघे दिसणार असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा करण-अर्जुन ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भन्साळी यांनी या पूर्वीदेखील या कलाकारांसोबत वेगवेगळ्या चित्रपटात काम केलेले आहे. पण भन्साळी यावेळेस सलमान व शाहरूखला एकत्र आणण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 
 
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच एक चित्रपट घेऊन संजय लीला भन्साळी येणार आहेत. ते या चित्रपटात बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरूख खान व सलमान खान यांना रुपेरी पडद्यावर एकत्र आणणार आहे. करण-अर्जुन चित्रपटात सलमान खान व शाहरूख खानने एकत्र काम केले होते. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगला लक्षात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच या चित्रपटाबाबतची घोषणा संजय लीला भन्साळी करणार आहेत. सलमान खानसोबत भन्साळींनी हम दिल दे चुके सनम चित्रपटात निर्माता म्हणून काम केले आहे आणि देवदास चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून शाहरूखसोबत काम केले आहे. रसिकांनी या दोन्हीचित्रपटांना खूप दाद दिली होती. सलमान व शाहरूख या जोडीसोबत भन्साळी रुपेरी पडद्यावर धमाल करतील, अशी आशा आहे.