1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (12:53 IST)

तारक मेहताचा उलटा चष्माच्या दिग्दर्शकांनी मालिका सोडली, शो बंद होणार ?

tarak mehta
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका घरा घरात पोहोचली.'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेला एक एक करून अनेक कलाकार राम राम ठोकत आहेत.
 
'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी, 'टप्पू'ची भूमिका भव्य गांधी यांसारख्या कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर आता दिग्दर्शकानेही मालिका सोडलीय.
 
दिशा वकानी, गुरचरण सिंह, शैलेश लोढा, भव्य गांधी यांनी आजवर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला राम राम ठोकला आहे. त्यानंतर मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही मालिका सोडलीय.त्यामुळे आता शो चा टीआरपी फार घसरला आहे. 

दिशा वकानी, गुरचरण सिंह, शैलेश लोढा, भव्य गांधी यांनी आजवर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला राम राम ठोकला आहे.आता दिग्दर्शकानेही मालिका सोडलीय. या वर दिग्दर्शक राजदा यांची पत्नी प्रिया आहुजा ज्यांनी या मालिकेत रीटा रिपोर्टरची भूमिका साकारली त्यांनी शोच्या घसरणाऱ्या टीआरपी बद्दल सांगितले  

की टीआरपी ही कमी जास्त होणारच. तारक मेहता ही मालिका आता प्रेक्षकांचं मनोरंजन पूर्वी सारखे करत नाही. मालिकेतून लोकप्रिय कलाकार कमी होत आहे. त्यामुळे शो बंद होण्याच्या मार्गावर आहे असे मला वाटत नाही. लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन आता वेगळा झाला आहे. आता दिगदर्शक मालव राजदा यांनी  देखील ही मालिका सोडली आहे. 
 
मालव राजदा हे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेसोबत 14 वर्षे जोडलेले होते. ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली आणि मालव राजदा सुरुवातीपासूनच मालिकेसोबत होते.

या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान त्यांची मुलाखत प्रिया आहुजासोबत झाली होती. प्रिया आहुजा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत रीता रिपोर्टरची भूमिका करते.
 
मालिकेदरम्यानच प्रिया आणि मालव यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही 2011 मध्ये लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही आहे.
 
Edited By - Priya Dixit