1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (08:13 IST)

आर्यन खान संबंधित प्रकरणामध्ये अँटी ड्रग्स एजन्सीला अनेक त्रुटी आढळल्या

स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. आर्यन खान संबंधित प्रकरणामध्ये अँटी ड्रग्स एजन्सीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षताच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे.
 
या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तपासात जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला असून, त्यांच्या कामात अनेक उणिवा होत्या त्या या तपासादरम्यान समोर आल्या आहेत, असंही या अहवालात म्हटले आहे.
 
एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणात पुरावे नसतानाही तपास सुरू असून, प्रकरण पुढे नेले जात आहे. या प्रकरणात ४ वेळा ६५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, हे लोक वारंवार जबाब बदलत होते. त्यामुळे अनेकांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत, असंही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अशा काही गोष्टी पथकासमोर आल्या आहेत, ज्यामुळे इतर प्रकरणांच्या तपासातही त्रुटी असल्याचे दिसून आले आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor