शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (11:28 IST)

’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये हे पात्र परतणार; कोण आहे हा नवा कलाकार?

nattu kaka
मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मालिकेला नवीन नट्टू काका मिळाले आहेत. ज्येष्ठ रंगभूषाकार किरण भट्ट हे नवीन नट्टू काका असतील. तशी घोषणा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी केली आहे. त्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
 
मालिकेमध्ये यापूर्वी नट्टू काका यांची भूमिका घनश्याम नायक हे करीत होते. त्यांची जागा आता किरण भट्ट घेणार आहेत. घनश्याम नायक आता आपल्यात नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. मालिकेमध्ये त्यांची नट्टू काकांची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.
 
सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे किरण भट्ट आणि घनश्याम नायक हे खऱ्या आयुष्यातले मित्र होते. दोघांमध्ये वर्षानुवर्षे जुनी मैत्री होती. नाट्य उद्योगाच्या सुरुवातीच्या काळापासून ते एकमेकांना ओळखत होते. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एका पोस्टमध्ये किरण भट्ट यांची नवीन नट्टू काकांच्या भूमिकेत ओळख करून दिली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुम्ही सर्वांनी आम्हाला आणि नट्टू काकांना खूप प्रेम दिले आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. हेच प्रेम सदैव ठेवा, याच मुद्द्यावर आम्ही नवीन नट्टू काकांना सादर करत आहोत.  ३० जूनपासून नट्टू काका मालिकेमध्ये दिसायला लागले आहेत.
 
दरम्यान, नट्टू काकांचे म्हणजेच घनश्याम नायक यांचे चाहते भावूक झाले आहेत. ते घनश्याम नायक यांना अद्यापही खुप मिस करीत आहेत. नट्टू काकांच्या भूमिकेत घनश्याम नायक यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असेही चाहत्यांचे म्हणणे आहे. तसे, चाहत्यांनाही भावूक व्हावे लागते. या शोच्या सर्वच पात्रांबद्दल लोकांना विशेष आकर्षण आहे.