सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 24 मार्च 2024 (10:38 IST)

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा ट्रेलर २६ मार्चला होणार रिलीज

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपणार असून, नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
 
विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या ट्रेलरची वाट पाहत आहेत. वासू भगनानी आणि पूजा एंटरटेन्मेंटच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा ट्रेलर २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील जबरदस्त अ‍ॅक्शन आणि चमकदार स्टार कास्ट प्रेक्षकांचा थरार वाढवणार आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘वल्लाह हबीबी’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले, जे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
 
वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. १० एप्रिल २०२४ रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ. आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Edited By -Ratnadeep Ranshoor