बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 एप्रिल 2025 (15:02 IST)

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

Actor KRK post
टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत वादांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेता केआरके म्हणजेच कमाल रशीद खान पुन्हा एकदा त्याच्या मृत्यूच्या इच्छेमुळे चर्चेत आले आहेत. त्याने ट्विट केले आहे की माझी शेवटची इच्छा आहे की मी विमान अपघातात मरावे. लोकांनी माझे शरीर पुरावे असे मला वाटत नाही. हे ऐकून सोशल मीडिया युजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. 
केआरके नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकले असतात.अनेकदा त्यांचे ट्विट आणि इंस्टाग्राम पोस्ट लोकांचे लक्ष वेधून घेतात.आता त्यांच्या नवीन ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. 
त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे माझी शेवटची इच्छा आहे की माझा मृत्यू विमान अपघातात व्हावा.जेणे करून माझ्या मृतदेहाला कोणी दफन करू नये.
माझे मृतदेह सापडले नाही तर मला खूप आनंद होईल. अभिनेत्याची ही पोस्ट वाचल्यानंतर, आता नेटकरी त्यांच्या ट्विटवर पुन्हा कमेंट करत आहेत. 
Edited By - Priya Dixit