मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (12:42 IST)

साराला करायचे 'हे' चित्रपट

'केदारनाथ'मधून पदार्पण केलेल्या आणि सध्या 'सिम्बा'चे यश चाखत असलेल्या साराला आपल्या आईचे दोन चित्रपटही आपण करावेत, असे वाटत आहे. अमृतासिंहचे हे दोन चित्रपट व त्यामधील तिची भूमिका साराला अतिशय आवडतात. 'चमेली की शादी' आणि 'बेताब' हे ते दोन चित्रपट. तिने एका मुलाखतीत सांगितले, माझ्या आईची अभिनयक्षमता खूप मोठी आहे.
 
तिच्या जवळपासही मी जाईन असे मला वाटत नाही. विशेषतः तिचा उत्स्फूर्त, नैसर्गिक अभिनय मला अतिशय आवडतो. 'चमेली की शादी'मधील तिने अचूक टायमिंग साधून केलेला विनोद आजही मला थक्क करतो. 'बेताब'मधील तिचा निरागसपणा मला भावतो. त्यामध्ये ती दिसतेही सुंदर. तिने 'आईना'मध्ये केलेली भूमिकाही मला आवडते.
 
थोडीशी निगेटिव्ह शेड असलेली ही भूमिका केवळ तिच करू शकते. अगदी अलीकडचा तिचा आवडलेला चित्रपट म्हणजे 'टू स्टेट्‌स'. त्यामधील तिची आईही न विसरणारीच आहे. बराच काळ अभिनयापासून दूर राहिल्यावरही तिने यामध्ये जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पदच आहे. साराने आपल्या आईचा जो गुणगौरव केला आहे तो खोटा नाही. अर्थात अशा भूमिका मिळणे व त्या समर्थपणे साकारणे हे महत्त्वाचेच आहे.