1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (15:02 IST)

आदाबचा राग येतो- अशा वेळी लोकांना मारायची इच्छा होते

मुकेश खन्ना हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. त्यांनी नुकताच यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश खन्नांनी विमलच्या जाहिरातीवरुन बॉलिवूडच्या स्टार्संवर टीका केली आहे. या संबंधित पोस्टर ट्विटरवर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
विमलच्या जाहिरातीवर बोलताना मुकेश खन्ना यांनी अजय देवगनचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात की, “जेव्हा एखादी व्यक्ती समोरुन नमस्कार करते किंवा आदाब करते, तेव्हा किती छान वाटतं. पण जर हा आदाब केशरी रंगाचा गैरवापर करुन गुटख्यासारख्या व्यसनाला प्रमोट करत असेल, तर त्या नमस्कार/ आदाबचा राग येतो. अशा वेळी लोकांना मारायची इच्छा होते. बॉलिवूडचे तीन-तीन सुपरस्टार्स ‘बोलो जुबा केसरी..’ म्हणत अशा वाईट गोष्टीच्या प्रचलनासाठी जाहिरात करत आहेत याची चीड येते.”