शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (10:34 IST)

कंगना रणौतला जिवे मारण्याची धमकी,पोलिसांची मदत मागितली

kangana
कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. खरं तर, अभिनेत्रीला अलीकडेच सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. लवकरच चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सोमवारी (26 ऑगस्ट) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये काही लोक कंगना रणौतला धमकी देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रिट्विट करत अभिनेत्रीने पोलिसांची मदत मागितली आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला हिंसाचाराबद्दल बोलताना ऐकू येते. 

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे. एका यूजरने X वर लिहिले की, "गृहमंत्रालयाने यावर कठोर कारवाई करावी." दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, "हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे." त्याचवेळी आणखी एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, मला आशा आहे की यावर कठोर कारवाई केली जाईल.
इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबर रोजी चित्रपट गृहात दाखल होणार आहे. 

अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमन, श्रेयस तलपडे, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक सारखे कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. 
Edited By - Priya Dixit