सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (20:34 IST)

Kangana Ranaut Slap Case: कंगना थप्पड प्रकरणी कुलविंदर कौरवर कारवाई दोन कलमांखाली एफआयआर दाखल

Kangana
कंगना राणौतला गुरुवारी चंदीगड विमानतळावर महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कानाखाली  मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या प्रकरणी महिला जवानाला निलंबित करण्यात आले असून कंगना राणौतला कानाखाली मारणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुलविंदर कौर विरुद्ध कलम 323 आणि 341 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गुरुवारी चंदीगड विमानतळावर CISF महिला कॉन्स्टेबलने कंगना राणौतच्या कानशिलात लगावली. त्यांनतर महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केले होते, त्यामुळे तिने हे केले. 

व्हिडीओमध्ये महिला कॉन्स्टेबल म्हणताना दिसत आहे की, तिने कंगनाला कानाखाली  मारली कारण कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी महिलांना सांगितले होते की, तिथे बसलेल्या महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन बसल्या आहेत. त्या आंदोलनात माझी आईही बसली होती,
 
कंगना रणौतने गुरुवारी तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, चंदिगड विमानतळावर घडलेली घटना सुरक्षा तपासणीदरम्यान घडली. मी सीआयएसएफ महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तिने माझ्या कानाखाली मारले आणि शिवीगाळ केली. 

तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही ही घटना गंभीर असल्याचे सांगून आरोपी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून, आयोगाने हे प्रकरण सीआयएसएफकडे घेतले आहे . एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी असलेले लोक स्वतःच सुरक्षेचे उल्लंघन करत आहेत.

सीआयएसएफ महिला कर्मचाऱ्यांवर जलद कारवाई करत पोलिसांनी तिच्याविरुद्ध कलम 323 आणि 341 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघेही जामीनपात्र कलमांतर्गत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

Edited by - Priya Dixit