सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बाळासाहेब यांच्या तीन संवादांवर सेन्सॉरची कात्री हे आहेत संवाद

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित झाला आहे. या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप नोंदवला असून,  ठाकरे चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या आक्षेपांवर शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार, याबद्दल उत्सुकता आहे. 
 
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं, त्यामधील विधानं वादात सापडली. त्याचप्रमाणे ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपटदेखील काहीसा वादात सापडताना दिसत आहे. या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला.

यातील एक संवाद बाबरी मशिदीशी निगडीत आहे. तर दुसरा संवाद हा दक्षिण भारतीयांशी संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईतील दक्षिण भारतीयांवर कडाडून टीका केली होती त्यावर देखील आक्षेप नोंदवला आहे. 

दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित चित्रपटातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.

ठाकरे मध्ये नवाजुद्दिन याने भूमिका साकारली असून ट्रेलर मध्ये शिवसेना उदय आणि बाबरी मस्जिद पाडली हे सर्व दिसून येते आहे. तर मी फक्त जनतेची अदालत मानतो असा एका त्याचा डॉयलॉग देखील दिसून येतो आहे.