मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 डिसेंबर 2018 (09:27 IST)

म्हाडा लॉटरी : शिवसेनेच्या विनोद शिर्के यांना महागडी दोन घरे लागली

Shiv Sena
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वाधिक उत्सुकता ग्रँट रोड-धवलगिरी येथील ३ सर्वात महागड्या (५ कोटी रुपये) घरांची होती. आग्रीपाडा शाखा क्रमांक २१२ चे शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना या महागड्या घरांपैकी तब्बल दोन  घरे लॉटरीत लागली आहेत.
 
उच्च उत्पन्न गटाच्या यादीतील संकेत क्रमांक ३६७ मधील एकमेव घर (किंमत ५ कोटी १३ लाख) विनोद शिर्के यांना जाहीर झाले. त्यानंतर लगेचच संकेत क्रमांक ३६८ मधील एकमेव घराच्या लॉटरीतही विनोद शिर्के यांचेच नाव स्क्रीनवर झळकले आणि सगळीकडे फक्त शिर्के यांच्या नावाचीच चर्चा सुरू झाली. संकेत क्रमांक ३६८ मधील या घराची किंमत ५ कोटी ८० लाख रुपये आहे. मात्र, म्हाडाच्या नियमानुसार त्यांना एका अर्जदाराला दोन घरे लॉटरीत लागल्यास एक घर परत करावे लागते.
 
विनोद शिर्के हे आग्रीपाडा विभागातील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम करतात. गेली १७ वर्षे ते आयटी कन्सलटंट म्हणून कार्यरत आहेत. ज्यात त्यांनी ११ वर्षे आयबीएम, तर पुढची ६ वर्षे टीसीएस कंपनीत आयटी कन्सलटंट म्हणून काम पाहिले आहे. २०१४ पासून ते शिवसेनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. विनोद शिर्के पत्नी, सहा वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे यांच्यासमवेत आग्रीपाड्यातील बीआयटी चाळ क्रमांक २९ मध्ये वास्तव्यास आहेत.